शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पोलीस निरीक्षक झाला खासदार; जुन्या सहकाऱ्यांना पाहताच ठोकला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:20 PM

व्हायरल झालेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

हैदराबाद: खासदार, मंत्र्यांना पाहताच सलाम ठोकणारे पोलीस कायम दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एक खासदार पोलीस अधिकाऱ्यांना सलाम करताना दिसत आहे. बहुतांश खासदार पोलिसांनी सलाम केल्यास तो अपमान समजत असताना हा खासदार पोलिसांना इतक्या आनंदानं सलाम का करतोय, असा प्रश्न हा फोटो पाहून अनेकांना पडला. या फोटोमागील कहाणी अतिशय रंजक आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे सर्कल इन्स्पेक्टर गोरंतला माधव यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढवली. हिंदूपूरमधून त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला. तेलुगू देसम पक्षाच्या क्रिस्ताप्पा निम्मला या विद्यमान खासदाराचा त्यांनी 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला. यानंतर माधव यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बशा यांच्याशी भेट झाली. सेवेत असताना बशा हे माधव यांना वरिष्ठ होते. त्यामुळेच बशा समोर येताच माधव यांनी त्यांना सलाम केला. तर बशा यांनीही खासदार झालेल्या माधव यांना सलाम ठोकला. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माधव यांचा पोलीस अधिकाऱ्याला सलाम करतानाचा फोटो व्हायरल होताच अनेकांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडीयावर याबद्दल बरीच चर्चादेखील झाली. त्यावर माधव यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मला माझे जुने वरिष्ठ अधिकारी मतमोजणी केंद्रावर दिसले. त्यांना मी सलाम केला आणि मग त्यांनी मला सलाम केला. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याच भावनेतून आम्ही एकमेकांना सलाम केला,' अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Member of parliamentखासदारTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीAndhra Pradeshआंध्र प्रदेश