शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 14:06 IST

Coronavirus : कोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद

ठळक मुद्देकोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा.गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. काही दिवसांपासून सातत्यानं साडेतीन-चार लाखांच्या जवळपास रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत  आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, अनेक देशांकडून मोठ्या प्रमाणात मदतही करण्यात येत आहे. आता अमेरिकेच्या Pfizer या कंपनीनं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फायझर भारतासाठी तब्बल ७ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या औषधं भारतात पाठवणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास भारताला मदत मिळणार आहे. याशिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारताला संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी Pfizer नं मदतीचा हात पुढे केला आहे.कंपनी भारताला ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवणरा आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बॉरला यांनी ही माहिती दिली. याशिवाय आपल्या लसीला भारतात लवकरात लवकर परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती बॉरला यांनी लिंक्डीनवरून दिली. आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नाही, असंही त्यांनी नमूद केलं. आमची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. तसंच याला मंजुरी मिळाल्यास देशात याच्या वापरास सुरूवात करता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात २४ तासांत ३,४१७ मृत्यूदेशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३४१७ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ झाली असून, त्यातील १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख १८ हजार ९५९ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख १३ हजार ६४२ इतकी आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाGovernmentसरकारIndiaभारत