शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा पीएफआयने रचला होता कट, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 08:05 IST

गेल्या काही दिवसांपासून पीएफआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असून त्यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. 

बिहारची राजधानी पाटण्यात विधानसभा कार्यक्रमासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटक करण्यात आलेल्या केरळमधील आरोपींनी केलेल्या धक्कादायक खुलाशाने खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएफआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असून त्यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. 

केरळमध्ये अटक केलेल्या शफिक पायेथ याने एनआयए आणि ईडीच्या चौकशीत ही माहिती दिली. चौकशीतील माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांच्यावर पाटण्यात हल्ला करण्याचा कट पुन्हा एकदा आखण्यात येत होता. यासाठी एका प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पीएफआय मॉड्यूल तयार करणे आणि अनेक संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट होता.

देशविरोधी कारवायात गुंतल्याचा गंभीर आरोप पीएफआयवर असून, २२ सप्टेंबर रोजी एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकसह १५ राज्यांत ९६ जागांवर धाडी टाकल्या होत्या. त्यात अनेकांना अटक करण्यात आली आहे. १२० कोटी रुपये आतापर्यंत जप्त होता. करण्यात आले आहेत. पीएफआयचे प्रकरण पाटण्याच्या फुलवारी शरीफमधून समोर आले होते. सुरुवातीला पाटणा पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल केला होता.ठिकाण : पाटणा, तारीख : १२ जुलै

  • देशात पाळेमुळे मजबूत करण्यासाठी पीएफआयने पूर्ण रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी प्रथम केरळ व तेलंगणासह दक्षिण भारताच्या राज्यात स्वतःची स्थिती मजबूत केली. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, १२ जुलै रोजी पंतप्रधानांच्या पाटणा दौऱ्यात त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता. यासाठी पीएफआय शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्याच्या तयारीत होता.
  • जुलैमध्येच संघटनेवर मोठी कारवाई झाली. या कारवाईत अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आले. यात भारताला मुस्लिम राष्ट्र बनविण्याचे ब्लू प्रिंटही आहे
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत