शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

पीएफ पेन्शन दसपट वाढणार?

By admin | Updated: April 12, 2017 04:20 IST

खाजगी कंपन्या, महामंडळे आणि सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात

नवी दिल्ली : खाजगी कंपन्या, महामंडळे आणि सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात ४ ते १0 पट वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. ही वाढ पूर्वलक्ष्यी प्रभावाने १ जानेवारी १९९५पासून लागू होणार असून, त्यामुळे सध्या निवृत्तिवेतन घेणाऱ्यांना मागील काळातील फरकाची रक्कम मिळणार आहे. सरकारने २३ मार्च रोजीच ईपीएफओच्या संबंधित कार्यालयांना यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मासिक निवृत्तिवेतनात ६,२00 ते २६,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. वाढीव निवृत्तिवेतन अदा करण्यासाठी ईपीएफओच्या कार्यालयांना आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यास सांगण्यात आले आहे. ही सर्व कार्यवाही आॅगस्ट २0१७पर्यंत पूर्ण करावयाची आहे.मध्य प्रदेशातील खारगाव येथील सहकारी बँकेच्या कर्मचारी संघटनेने यासंबंधी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानुसार आता सरकारने आदेश जारी केला आहे. त्याआधी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानेही कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच निकाल दिला होता. सध्याच्या व्यवस्थेत ईपीएफओमार्फत किमान १ हजार आणि कमाल २,५00 रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जाते. सप्टेंबर २0१४पासून या रकमा अदा केल्या जात आहेत. १९९५पासून किमान ४४0 आणि कमाल १,७५0 रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जात होते. नव्या आदेशानुसार २,५00 रुपयांचे पेन्शन मिळणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास ८,७00 रुपये पेन्शन मिळेल. प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यास २८,५00 रुपयांचे पेन्शन मिळेल. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या १२ टक्के रक्कम ईपीएफओच्या फंडात दरमहा जमा होते. कंपन्यांकडूनही तेवढीच ईपीएफओला मिळते. तथापि, कंपन्यांच्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाते. त्यावर नंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. ईपीएफ आॅनलाइन काढण्याची सोयही संघटनेने करून दिली आहे. यात ३ तासांत रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते. अशी होईल निवृत्तिवेतनातील वाढश्रेणीसध्याचे पेन्शन नवे पेन्शन लाभचतुर्थ२,५00८,७00६,२00तृतीय २,५00 २0,000१७,५00द्वितीय २,५00 २२,000 १९,५00प्रथम २,५00 २८,५00२६,000