शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

गॅस एजन्सीच्या चेक, ड्राफ्टमुळे पेट्रोलियम मंत्रालय झाले बेजार; खोट्या आश्वासनांमुळे लोकांचा गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:32 PM

पेट्रोलियम मंत्रालयाकडे सध्या रोजच्या रोज असंख्य चेक आणि ड्राफ्ट येत असून, ते पाठवणा-यांना जवाहर रोजगार योजनेअंतर्गत गॅस एजन्सी हवी आहे. सुरुवातीला ते का येत नाहीत, हेच कळत नव्हते.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयाकडे सध्या रोजच्या रोज असंख्य चेक आणि ड्राफ्ट येत असून, ते पाठवणा-यांना जवाहर रोजगार योजनेअंतर्गत गॅस एजन्सी हवी आहे. सुरुवातीला ते का येत नाहीत, हेच कळत नव्हते. पण कोणी तरी दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे लोकांनी ते पाठवायला सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले. आता ते चेक व ड्राफ्ट परत करण्याचे काम सुरू झाले आहे.मंत्रालयातील एका अधिका-याने सांगितले की, रोज २५ ते ३0 चेक, ड्राफ्ट आमच्याकडे येत आहे. ते यायला सुरुवात झाल्यानंतर खात्यात गोंधळ सुरू झाला. एक खाते दुस-याकडे, दुसरे तिस-याकडे हे चेक व ड्राफ्ट पाठवू लागले. अखेर प्रकरण पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी ते संबंधितांना परत करा, असे आदेश दिले. तसेच ही योजना कोणी जाहीर केली वा कोणाला सांगितली, याचा शोध घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चेक, ड्राफ्ट परत पाठवतानाच, ही अफवा कोणी पसरवली, तिच्यामागे एखादी संघटित टोळी तर नाही ना, याआधी या लोकांकडून कोणी पैसे तर वसूल केले नाहीत ना, याचा शोध घेणे सुरू झाले आहे.लोकांकडे विचारणालोकांना खात्री वाटावी, म्हणून सरकारी खात्याच्या नावावर चेक घ्यायचे आणि रोख रक्कम स्वत: घ्यायची, असे कोणी करीत आहे का, हेही तपासले जात आहे. ज्यांचे चेक वा ड्राफ्ट आले आहेत, त्यांच्याकडेही याबाबत विचारणा केली जाणार आहे.