12 जुलै रोजी देशभरात पेट्रोल पंप बंदचा इशारा

By Admin | Updated: July 4, 2017 16:51 IST2017-07-04T16:51:29+5:302017-07-04T16:51:29+5:30

देशभरात 12 जुलै रोजी पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 12 जुलै रोजी राष्ट्रव्यापी पेट्रोल पंप बंदची हाक दिली आहे.

Petrol pumps across the country on July 12 | 12 जुलै रोजी देशभरात पेट्रोल पंप बंदचा इशारा

12 जुलै रोजी देशभरात पेट्रोल पंप बंदचा इशारा

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - देशभरात 12 जुलै रोजी पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 12 जुलै रोजी राष्ट्रव्यापी पेट्रोल पंप बंदची हाक दिली आहे.
 
ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय 5 जुलैपासून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. 
 
दररोज बदलणाऱ्या इंधन दरांबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.  पेट्रोलचे दर दररोज बदलत असल्याने त्यात अपारदर्शकता असल्याचे एआयपीडीएने म्हटले . दररोज बदलणाऱ्या दरांबद्दल संरक्षण देण्याची भूमिका इंधन विक्रेत्या कंपन्यांनी घेतली असली, तरी याबद्दल त्यांनी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही.  इंधन विक्रेत्या कंपन्यांनी 30 जूनची मुदत मागितली होती. मात्र ही मुदत टळून गेल्यावरही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता नेमकी केव्हा होणार, याबद्दल कालावधी निश्चित झालेला नाही. त्यामुळेच आम्ही बैठकीतून बाहेर पडत याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला,त्यामुळेच 12 जुलैपासून देशभरात इंधनाची विक्री केली जाणार नाही’ असे एआयपीडीएचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Petrol pumps across the country on July 12