शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:25 IST

इंधन दरवाढीवरुन स्वामींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. यावरुन आता भाजपाचे राज्यसभेतील सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 48 रुपये प्रति लिटर असायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे लोकांकडून वसूल करत असेल, तर ते शोषण आहे, असं स्वामी यांनी म्हटलं. आज मुंबईत पेट्रोलचा दर 86.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे आता भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा अधिक वाढवले जाऊ नयेत. सरकार यापेक्षा जास्त किंमत जनतेकडून वसूल करत असेल, तर ती सर्वसामान्यांची लूट आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारचा समाचार घेतला. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. राज्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीत सोमवारी (3 सप्टेंबर) रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर दर 87.97 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.09 होता. त्यानंतर आज त्यामध्ये वाढ होऊन पेट्रोलचा प्रतिलिटर दर 88.14 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.29 झाला आहे. सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनानं होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लिटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितलं आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल