पेट्रोल ८२, डिझेल ६१ पैशांनी महाग
By Admin | Updated: February 16, 2015 04:03 IST2015-02-16T04:03:17+5:302015-02-16T04:03:17+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला दरकपातीचा ट्रेंड फिरवित सार्वजनिक तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली

पेट्रोल ८२, डिझेल ६१ पैशांनी महाग
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला दरकपातीचा ट्रेंड फिरवित सार्वजनिक तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली. दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. आॅगस्ट २०१४ नंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे ८२ पैसे व डिझेलचे दर प्रति लिटरमागे ६१ पैशांनी वाढविले आहेत.
दरवाढ स्थानिक दर वगळून प्रत्यक्षातील पेट्रोलचे दर हे १ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे दर प्रति लिटर ९० पैशांच्या आसपास असतील.