पेट्रोल- डिङोल स्वस्त!
By Admin | Updated: November 1, 2014 02:07 IST2014-11-01T02:07:00+5:302014-11-01T02:07:00+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने नीचांक गाठल्याच्या पाश्र्वभूमीवर पेट्रोलच्या किमती प्रतिलीटर दोन रुपये 41 पैशांनी कमी करण्यात आल्या

पेट्रोल- डिङोल स्वस्त!
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने नीचांक गाठल्याच्या पाश्र्वभूमीवर पेट्रोलच्या किमती प्रतिलीटर दोन रुपये 41 पैशांनी कमी करण्यात आल्या असून, डिङोलच्या किमतीत सव्वादोन रुपयांची घट करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी जाहीर केला. या दोन्ही इंधनांचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या दोन्ही दरांच्या कपातीमध्ये स्थानिक करांचा समावेश नसल्याने प्रत्यक्षातील दरकपात अडीच ते पावणोतीन रुपयांच्या आसपास आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या गेल्या दोन महिन्यांत प्रतिबॅरल 115 अमेरिकी डॉलरवरून 82 डॉलर प्रतिबॅरल इतक्या कमी झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन्ही इंधनांत दरकपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. किंबहुना, तेलाच्या या पातळीवरील किमती याच दरम्यान आणखी किमान दोन महिने स्थिर राहण्याचा अंदाज असल्याने पेट्रोल व डिङोल या दोन्ही इंधनांच्या किमती आणखी किमान तीन रुपयांनी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात ऑगस्टपासून सहाव्यांदा दरकपात झाली असून, 18 ऑक्टोबर रोजी सरकारी नियंत्रणातून मुक्त झालेल्या डिङोलच्या दरातील गेल्या पाच वर्षातील ही दुसरी दरकपात ठरली आहे.
दरम्यान, पेट्रोल व डिङोलच्या किमतीत कपात झालेली असली, तरी नैसर्गिक वायूच्या किमतीत गेल्या आठवडय़ात सरकारने वाढ केल्यानंतर महानगर गॅसने सीएनजीच्या किमतीत वाढ केली आहे. सीएनजी साडेचार रुपये तर पाइप गॅसच्या किमतीत 2.49 रुपये वाढविण्यात आले.