पेट्रोल, डिझेलचे भाव रोज ठरणार
By Admin | Updated: April 8, 2017 05:37 IST2017-04-08T05:37:11+5:302017-04-08T05:37:11+5:30
सध्या महिन्यातून दोनदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव बदलतात, पण आता सोने व चांदीच्या दरात जशी रोजच्या रोज बदल होतात

पेट्रोल, डिझेलचे भाव रोज ठरणार
नवी दिल्ली : सध्या महिन्यातून दोनदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव बदलतात, पण आता सोने व चांदीच्या दरात जशी रोजच्या रोज बदल होतात, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबतही होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलजन्य पदार्थांचे भाव रोज ठरतात. त्याआधारे देशातही रोजच गरजेप्रमाणे पेट्रोल, डिझेलचे दर कमी वा अधिक करण्याचा विचार केंद्र सरकारच्या तेल कंपन्या करीत आहेत.