शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 8:28 AM

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत.

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel Price)च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 106.54 रुपये प्रति लिटरवर गेला आहे तर डिझेल 96.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी वाढ झाली असून आता ते 112.44 कुरए प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच, डिझेलच्या किंमतीमध्येही 37 पैशांनी वाढ झाली असून आता ते 103.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

प्रमुख शहरांमधील आजचा दर>> दिल्ली पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपये प्रति लिटर>> मुंबई पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 103.26 रुपये प्रति लिर>> चेन्नई पेट्रोल 103.61 रुपये आणि डिझेल 99.59 रुपये प्रति लिटर>> कोलकाता पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 98.38 रुपये प्रति लिटर 

ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढआतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.80 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.

दररोज सकाळी किंमती बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात, नवे दर सकाळी 6 पासून लागू केले जातात. अनेकवेळा दुसऱ्या दिवशीही सारखाच राहतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

सरकार इंधनावर कर लावते

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेल्या उसळीने 28 सप्टेंबरला पेट्रोल आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवर लागलेला ब्रेक संपवला. तेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीत 18 पट आणि डिझेलच्या किंमतीत 21 पट वाढ झाली आहे. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कावर आधारित इंधनाचे दर राज्यानुसार बदलतात. याशिवाय, केंद्र सरकार इंधनावर उत्पादन शुल्क लावते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेल