शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

इंधन दरकपात सुरुच; पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 7:51 AM

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे.मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 82.42 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 75.15 रुपये मोजावे लागणार आहेत.राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले आहेत. कपात करण्यात आलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 82.42 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी  75.15 रुपये मोजावे लागणार आहेत.

राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे राजधानीत प्रति लिटर पेट्रोलसाठी 76.91 रुपये, तर प्रति लिटर डिझेलसाठी 71.74 रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई : (सौजन्य - पेट्रोल-डिझेल प्राईज डॉट कॉम)

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

दिल्ली : (सौजन्य - पेट्रोल-डिझेल प्राईज डॉट कॉम)

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMumbaiमुंबईdelhiदिल्ली