शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

"पेट्रोल डिझेल LPG च्या किंमती वाढवून भाजपनं ४ राज्यांतील विजयाची पहिली भेट दिली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:37 IST

Petrol Diesel LPG Price Hike : छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांची भाजपवर जोरदार टीका. विजयानंतर भाजप दर वाढवणार असल्याचं यापूर्वीच सांगितल्याचंही वक्तव्य.

दोन दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) किंमतीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. यावरुन आता काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांनी चार राज्यांतील विजयाची पहिली भेट दिल्याचं म्हटलं. 

"जेव्हा भाजप सत्तेत येईल तेव्हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढतील असं मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच सांगितलं होतं. ४ राज्यांमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांना इंधन आणि गॅसच्या किंमतीत वाढ करून पहिली भेट दिली आहे" असं बघेल म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता. "गॅस, डिझेल आणि पेट्रोलवर लावलेला लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. आता सरकार सातत्यानं किंमतीचा विकास करेल. महागाईच्या महासाथीबद्दल पंतप्रधानांना विचारलं तर ते थाळ्या वाजवण्यास सांगतील," असं ट्वीट त्यांनी केलं होतं. दोन दिवसांपासून दरवाढचार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपासून इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. चार महिन्यांपूर्वी दिवसाला २५-३० पैशांनी वाढणारे दर आज ८५ पैशांनी वाढू लागले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात ८४ तर डिझेलच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली. मुंबईत हे दर पेट्रोल १११.६७ आणि डिझेल ९५.८५ झाले आहेत. तर सिंधुदुर्गात पेट्रोल ११३.३७ आणि डिझेल ९६.०४ रुपये झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाPetrolपेट्रोलDieselडिझेलcongressकाँग्रेस