पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल १ रुपयाने स्वस्त

By Admin | Updated: April 1, 2015 12:08 IST2015-04-01T11:26:27+5:302015-04-01T12:08:49+5:30

पेट्रोल प्रती लिटर ४९ पैशांनी तर डिझेल प्रती लिटर १ रुपया २१ पैशांनी स्वस्त झाल्याने महागाईने त्रासलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळेल.

Petrol costs 49 paise and diesel 1 rupee is cheap | पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल १ रुपयाने स्वस्त

पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल १ रुपयाने स्वस्त

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - महागाईने त्रासलेल्या जनतेसाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर... पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असून त्यामुळे जनतेला थोडा तरी दिलासा मिळणार आहे. पेट्रोल प्रती लिटर ४९ पैशांनी तर डिझेल प्रती लिटर १ रुपया २१ पैशांनी स्वस्त झाले आहे. सलग दोनवेळा भाववाढ करण्यात आल्यानंतर आज झालेल्या दरकपातीमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घट झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नव्या दरांमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ६० रुपये तर डिझेलचा दर ४८.५० रुपये इतका होईल. 
 

Web Title: Petrol costs 49 paise and diesel 1 rupee is cheap