शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 20:55 IST

रुपयाची घसरणीनं आयात महागल्यानं इंधन दरवाढ सुरुच राहणार

नवी दिल्ली: सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. इंधनात होणारी ही दरवाढ सुरूच राहील, असे संकेत पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांना पेट्रोल, डिझेल दरात एक रुपयाची कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी इंधनाच्या दरावर सरकार नियंत्रण आणणार नाही, असं प्रधान यांनी स्पष्ट केलं. सरकारकडून पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रित केले जाणार नसल्यानं त्यात होणारी वाढ कायम राहणार आहे. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त राखण्याच्या निर्णयापासून मागे हटण्याचा प्रश्चन येत नाही, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं. 'आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढत आहेत. खनिज तेलाच्या दरांनी चार वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. सध्या प्रति बॅरलसाठी 85 डॉलर मोजावे लागत आहेत. खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती हे मोठं आव्हान आहे. खनिज तेलाचे दर वाढल्यानं पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. उत्पादन शुल्कात कपात करुनही दर वाढतच आहेत,' असं प्रधान एका कार्यक्रमात म्हणाले. खनिज तेलाच्या दरांबद्दल चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाचे पेट्रोलियम मंत्री खालिद ए. एल. फलीह यांच्याशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली. 'भडकलेले इंधन दर कमी करण्यासाठी ओपेककडून (तेल निर्यातदार देश) दररोजच्या तेल उत्पादनात 10 लाख बॅरलची वाढ करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याची आठवण फलीह यांना करुन देण्याच आली आहे. मात्र बहुधा ओपेक देश जून महिन्यात देण्यात आलेल्या त्या आश्वासनाप्रमाणे कृती करत नसावेत,' असं प्रधान यांनी सांगितलं. एकीकडे खनिज तेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे रुपयाचं मूल्य घसरत आहे. त्यामुळे आयात महागली आहे. याचा परिणाम म्हणून दररोज इंधन दरवाढ होत आहे.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल