मंत्र्याच्या पदवीवरून पेटला वाद
By Admin | Updated: November 15, 2014 02:08 IST2014-11-15T02:08:39+5:302014-11-15T02:08:39+5:30
मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीचा वाद पुरता शमला नसतानाच त्यांच्याच खात्याचे राज्यमंत्री आर. एस. कठेरिया यांच्या पदवीचा मुद्दा जोर पकडत आहे.

मंत्र्याच्या पदवीवरून पेटला वाद
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीचा वाद पुरता शमला नसतानाच त्यांच्याच खात्याचे राज्यमंत्री आर. एस. कठेरिया यांच्या पदवीचा मुद्दा जोर पकडत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. मोदी संसदेत आपल्या मंत्र्यांचा परिचय करवून देतील तेव्हापासूनच काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतलेला असेल. माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर हल्लाबोल करताना कठेरिया यांची पदवी कुठून आणली याची माहिती द्यावी. या प्रकरणी तपास पूर्ण होईर्पयत कोणतातरी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. कठेरिया कसे खोटे बोलतात हे दाखविण्यासाठी काँग्रेसने कठेरिया यांच्या बनावट गुणपत्रिकेच्या प्रतीही वाटल्या. स्मृती इराणी यांनी त्यांच्याकडे कोणती पदवी आहे ते त्यांना आजर्पयत सांगता आलेले नाही, असे टीकास्त्र काँग्रेसने सोडले आहे.
4मोदी पंतप्रधान बनल्यानंतर स्मृती इराणी आणि कठेरिया यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कठेरिया यांनी आपल्या गुणपत्रिकेत स्वत:च गुण भरले आहेत. विद्यापीठातून गुण दिले जातात हे त्यांना माहीत नसावे, असा टोला खुर्शीद यांनी हाणला.