तिरडी बांधताना पर्सनल लोनसाठी केला फोन, न्यायालायने ठोठावला दंड
By Admin | Updated: April 25, 2017 14:45 IST2017-04-25T14:45:43+5:302017-04-25T14:45:43+5:30
मोबाईलवर आवश्यक कॉल्सबरोबर अनावश्यक कॉल्सही मोठया प्रमाणात येतात. खासकरुन उत्पादन विक्रीसाठी येणा-या कॉल्समुळे अनेकांची चिडचिड होते.

तिरडी बांधताना पर्सनल लोनसाठी केला फोन, न्यायालायने ठोठावला दंड
ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. 25 - मोबाईलवर आवश्यक कॉल्सबरोबर अनावश्यक कॉल्सही मोठया प्रमाणात येतात. खासकरुन उत्पादन विक्रीसाठी येणा-या कॉल्समुळे अनेकांची चिडचिड होते. टेलिकॉलर कंपन्यांनी आपला छळ चालवला आहे अशीच अनेकांची भावना असते. बहुतांश कॉल्स हे पर्सनल लोन आणि क्रेडीट कार्डसाठी विचारणा करणारे असतात. महत्वाच म्हणजे या कॉल्सना कुठली काळवेळ नसते. आपण एखाद्या अतिशय महत्वाच्या कामात बिझी असताना पर्सनल लोनसाठी विचारणा करणारा कॉले येतो आणि आपली चिडचिड होते.
अशाच एका प्रकरणात स्थानिक ग्राहक न्यायालयाने नागरिकांना त्रास देणा-या फोन कॉल्स प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. वडोदरा येथील स्थानिक ग्राहक न्यायालयाने आय-क्युब ही टेलिकॉलर कंपनी आणि कन्हयालाल ठक्कर या दोघांना तक्रादाराला त्रास दिला 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पी.व्ही.मुरजानी आपल्या चुलत भावाच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना आय-क्युबकडून पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डसाठी विचारणा करणारा फोन आला होता.
आयक्युब आणि कन्हयालाल दोघांनी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपये मुरजानी यांना द्यावे असे आदेशात म्हटले आहे तसेच आय क्युब आणि व्होडाफोन एस्सार गुजरात लिमिटेडला ग्राहक कल्याण निधीला 10 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. आपला फोन नंबर आणि व्यक्तीगत माहिती टेलिकॉलर कंपनीला देऊन प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारदाराने म्हटले होते.