शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:59 IST

बेळगावातील वृद्ध जोडप्याच्या आत्महत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.

Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका वृद्ध जोडप्याने सायरब फ्रॉडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं प्रकरण गेल्या महिन्यात समोर आलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती महाराष्ट्र शासनामध्ये माजी अधिकारी होती. मुंबई क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी वृद्धाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली होती. या त्रासाला कंटाळून वृद्ध जोडप्याने आत्महत्या केली होती. आता पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे.

निवृत्त सरकारी कर्मचारी ८३ वर्षीय डिएगो सँटन नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लावियाना यांचे मृतदेह बेळगावी येथील खानापूर येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आले. निवृत्त दाम्पत्य पूर्वी महाराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होते. डिएगो नाझरेथ आणि त्यांची पत्नी हे गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांमुळे हैराण झाले होते. नैराश्यात गेलेल्या दोघांनीही स्वतःला संपवले. आता नाझरेथ यांना धमकावणाऱ्याला कर्नाटकपोलिसांनी अटक केली आहे.

"गेल्या महिन्यात बेळगाव येथे एका वृद्ध जोडप्याच्या आत्महत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. चिराग जीवराज भाई लक्कड असे आरोपीचे नाव असून तो सुरतचा रहिवासी आहे," अशी माहिती सोमवारी कर्नाटक पोलिसांनी दिली. २७ मार्च रोजी डिएगो , नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लेव्हियाना नाझरेथ हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकारी असल्याचे सांगून आमची फसवणूक केल्याचे नाझरेथ यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

आरोपी चिरागने डिएगो यांना तुमच्या नावाने सिम कार्ड खरेदी केले असून त्याचा गैरवापर  बेकायदेशीर कामांसाठी केला जात आहे, अशी माहिती दिली होती. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून जोडप्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. तुमचा मोबाईल आयडी आणि कागदपत्रे काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरली गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असं चिरागने वृद्ध दाम्पत्याला सांगितले. घाबरलेल्या दाम्पत्याने ही रक्कम आरोपींना दिली. मात्र त्यानंतर धमक्या आणि पैशाची मागणी वाढत गेली. नाझरेथ यांनी अनेक राज्यांमधील २२ बँक खात्यांमध्ये ५९.६३ लाख रुपये ट्रान्सफर केले.

"लक्कडकडे बालाजी इंडस्ट्रीजच्या बँक खात्याशी जोडलेले सिम कार्ड होते आणि तेथून नेट बँकिंगद्वारे पैसे इतर दोन खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले. तो एका मोठ्या साखळीचा भाग आहे आणि कमिशनसाठी काम करत होता. चौकशीनंतर, आम्ही त्याला न्यायालयीन कोठडीत सोपवले आहे," असे पोलिसांनी सांगितले.

नाझरेथ हे मुंबईतील सचिवालयात काम करत होते आणि निवृत्तीनंतर ते बेळगावातील बिडी गावात स्थलांतरित झाले होते. फ्लावियाना यांचा मृतदेह घरात तर डिएगो यांचा मृतदेह घराबाहेरील नाल्यात सापडला होता. दोघांनीही विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. गोळ्या खाल्ल्यानंतर डिएगो यांनी गळा चिरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाण्याच्या टाकीत उडी मारली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस