सरसंघचालकांच्या सभेला कोलकाता पोलिसांनी नाकारली परवानगी
By Admin | Updated: January 12, 2017 22:12 IST2017-01-12T22:12:16+5:302017-01-12T22:12:16+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये ताणलेल्या संबंधांच्या अनुषंगाने याकडे पाहिलं जात आहे.

सरसंघचालकांच्या सभेला कोलकाता पोलिसांनी नाकारली परवानगी
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 12 - कोलकातामध्ये 14 जानेवारीला होणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत सहभागी होणार होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये ताणलेल्या संबंधांच्या अनुषंगाने याकडे पाहिलं जात आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हे एका रॅलीला संबोधित करणार होते तसेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार होते. कोलकाताच्या पश्चिमेकडील किद्दरपोर येथील भूकैलाश मैदानावर सभा घेण्याबाबत संघाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर ब्रिगेड परेड मैदानावर सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती संघाच्या नेत्यांनी केली होती.
Kolkata Police tells RSS that it cannot give permission for a rally on January 14. Asked to fix alternative date.
— ANI (@ANI_news) 12 January 2017
मात्र, पोलिसांनी पुन्हा या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. दुस-या तारखेला सभा घ्यावी असं पोलिसांनी आरएसएसला सांगितलं आहे.