नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि हापूर जिल्ह्यातील नागरिकांना बोअरवेल वापरण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल, असे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केले आहे. जे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत व ज्यांच्याकडे पाण्याचा दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही, त्यांना ही परवानगी आवश्यक आहे. तथापि, आम्हाला नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत करायचे नाहीत. फक्त त्यांनी परवानगी घेतली नसेल तर ती घ्यावी, असेही लवादाने स्पष्ट केले. परवानगी मिळवण्यासाठी नागरिकांनी सेंट्रल ग्राऊंड वॉटर अॅथॉरिटीकडे अर्ज करावा, असेही आदेशात म्हटले आहे. न्या. जवाद रहीम यांच्या नेतृत्वाखालील पीठाने याबाबतचे आदेश दिले आहेत.
बोअरवेलसाठी परवानगी हवी
By admin | Updated: May 4, 2017 01:30 IST