शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी ‘वर्क फ्राॅम हाेम’ शक्य, नव्या मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:52 IST

work from home : तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना याचा जास्त लाभ झाला. या कंपन्यांना दूरसंचार विभागाने दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात लाखाे लाेकांना ‘वर्क फ्राॅम हाेम’ या संकल्पनेने तारले. आता तंत्र उद्याेगासाठी ही संकल्पना कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. दूरसंचार विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे हे शक्य हाेणार आहे.‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेने अनेक क्षेत्रांना संजीवनी दिली. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना याचा जास्त लाभ झाला. या कंपन्यांना दूरसंचार विभागाने दिलासा दिला आहे. इतर सेवा पुरवठादार कंपन्यांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक असलेली नाेंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसेच डाटा संबंधित काम असलेल्या बीपीओ क्षेत्राला ‘ओएसपी’च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. यासाेबतच बँक गॅरंटी, स्टॅटिक आयपी, नेटवर्क डायग्राम इत्यादींची आता आवश्यकता नाही. तसेच ‘वर्क फ्राॅम हाेम’ आणि ‘वर्क फ्राॅम एनीव्हेअर’ या संकल्पनेमध्ये अडसर ठरणाऱ्या इतर अटीही रद्द करण्यात आल्या आहेत.काेराेना महामारीच्या काळात ‘वर्क फ्राॅम हाेम’साठी तात्पुरत्या तरतुदी करण्यात आल्या हाेत्या. कायमस्वरूपी अंमलबजावणीसाठी मंत्रिगटाची नेमणूक करण्यात आली हाेती. दूरसंचार, कामगार आणि वाणिज्य मंत्रालयासाेबत समन्वय साधून मंत्रिगटाने या शिफारसी केल्या हाेत्या.  सरकारच्या निर्णयाचे नॅसकाॅमसह माहिती तंत्रज्ञान तसेच बीपीओ क्षेत्रातील कंपन्यांनी स्वागत केले आहे. ग्रामीण भागात राेजगार निर्मितीचा फायदा हाेईल, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

दाेन्ही कामांची सांगड घालणे महिलांना कठीणलाॅकडाऊनच्या काळत महिलांवर घरासाेबतच ऑफिसच्या कामाचाही ताण वाढला हाेता. ‘वर्क फ्राॅम हाेम’मुळे घर आणि ऑफिस या दाेन्ही कामांची सांगड घालणे महिलांना कठीण झाले हाेते. अनलाॅकनंतर राेजगाराची टक्केवारी हळूहळू वाढू लागली. परंतु, त्यात महिलांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी हाेते. त्यामुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेतही महिलांना नाेकरीची संधी कमीच असल्याची आकडेवारी सांगते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी