पान 4 पेडणे पाणी विभागात कंत्राटी कर्मचार्यांचा पगार थकला
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:50+5:302015-08-20T22:09:50+5:30
हणखणे : कंत्राटदारामार्फत कामाला घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कर्मचार्यांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. याबाबत अधिकार्यांसह कंत्राटदारानेही कर्मचार्यांना वार्यावर सोडल्याने भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे.

पान 4 पेडणे पाणी विभागात कंत्राटी कर्मचार्यांचा पगार थकला
ह खणे : कंत्राटदारामार्फत कामाला घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कर्मचार्यांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. याबाबत अधिकार्यांसह कंत्राटदारानेही कर्मचार्यांना वार्यावर सोडल्याने भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे. कंत्राटदारामार्फत चांदेल येथील पाणी प्रकल्पावर आणि तालुक्यातील इतर भागात गावागावात पाणीपुरवठा करण्यासाठी कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. या कर्मचार्यांचे दोन गट निर्माण केले असून एका गटात सुमारे 30 कर्मचारी, तर दुसर्या एका गटात 40 पेक्षा अधिक कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. पाणी विभागाच्या पेडणे येथील कार्यालयातील दोन कनिष्ठ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांचा निर्धारित महिन्याचा पगार सुमारे 8 हजार एवढा असून त्या कर्मचार्यांच्या हातावर फक्त 5800 रुपये महिन्याकाठी टेकविले जातात. हा पगारदेखील कर्मचार्यांना दोन-तीन महिने मिळतच नाही. याबाबत कर्मचार्यांनी वारंवार कंत्राटदार गोन्साल्वीस यांना फोन करून चौकशी केल्यावर पगार लवकरच देणार एवढेच उत्तर मिळते. त्यानंतर मात्र कंत्राटदार आपला फोन बंद ठेवतो. दरम्यान, कर्मचार्यांनी पाणी विभागाचे साहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्याशी विचारणा करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. लवकरच पगार दिला जाईल, एवढे साचेबद्ध उत्तर प्रत्येकवेळी कर्मचार्यांना ऐकविले जाते. पुढे गणेश चतुर्थी असून भविष्यात काय वाढून ठेवले आहे आणि आपल्याला ‘वाली’ कोण, असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे. मात्र, याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होतो. याचा सामना लोकांना करावा लागतो. कंत्राटदाराची बिले मात्र वेळेवर केली जातात, असे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)