शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांना बँकांमध्ये सीईओ, एमडीचे पद नाही, अर्थशास्त्राची पदवी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 09:50 IST

आरबीआयने नियमांमध्ये केले बदल

मुंबई : खासगी आणि सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ तसेच पूर्णकालीन संचालकांच्या नियुक्यांच्या नियमांमध्ये सुसंगती राहावी, यासाठी आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पदांवरील नियुक्त्यांचा कार्यकाळ एका वेळी पाच वर्षांपेक्षा अधिक राहणार नाही. तसेच राजकारण्यांची या पदांवर नियुक्ती करण्यास आरबीआयने प्रतिबंध घातला आहे. तशी अधिसूचना आरबीआयने काढली आहे.

या निर्णयामुळे सहकारी बँकांवर राजकारणी तसेच इतर नेत्यांच्या नियुक्त्या करून ठेवीदारांच्या गुंतवणुकीवर आता नागरी सहकारी बँकांना डल्ला मारता येणार नाही. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार खासगी आणि नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि पूर्णकालीन संचालकांची पहिली नियुक्ती किमान ३ वर्षांसाठी राहील. त्यांची पुनर्नियुक्ती करता येईल. त्यांच्या कामाचा मंडळातर्फे दरवर्षी आढावा घेण्यात येईल. मात्र, एकाच व्यक्तीला या पदांवर १५ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

सहकारी बँकांनी या पदावर नियुक्त करताना काही निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. पात्र व्यक्तीचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आणि ७० वर्षांपेक्षा अधिक नकाे. तसेच  संबंधित व्यक्ती खासदार, आमदार किंवा नगरसेवक नसावा, असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच या पदासाठी स्नातकोत्तर पदवीधारक, वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक पात्र असतील. तसेच बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर किमान ८ वर्षे काम करण्याचा अनुभवही पाठीशी असणे आवश्यक राहणार आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMLAआमदार