शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 11:16 IST

भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे.

बंगळुरू -  भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत, असे प्रकाश राज यांनी ट्विटरवरून नववर्षाच्या शुभेच्छा देताना जाहीर केले आहे. दरम्यान,  कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार असलेल्या प्रकाश राज यांनी गेल्या काही काळापासून देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीबाबत सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला प्रकाश राज यांनी ट्विट करून आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत घोषणा केली. '' सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, नव्या वर्षामध्ये एक नवी सुरुवात करताना नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. तुमच्या पाठिंब्याच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे. मी निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघाचे नाव लवकरच जाहीर करेन, अबकी बार जनता की सरकार'' असे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे. 

 रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश राज हे भाजपा सरकारवर अनेकदा केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. कथुआ येथील बलात्कार प्रकरण आणि गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादात सापडले होते. दरम्यान, कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारला काही तासांतच राजीनामा द्यावा लागल्यानंतर प्रकाश राज यांनी भाजपा  आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. ''कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. सामना सुरू होण्यापूर्वीच संपला. आता 56 इंचला विसरा, 55 ताससुद्धा कर्नाटक सांभाळू शकले नाहीत." असा टोला त्यांनी मोदी आणि भाजपाला लावला होता. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. 

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजPoliticsराजकारणKarnatakकर्नाटकIndiaभारत