शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ मंदिरात बिगरहिंदुंना प्रवेश दिला जावा, सर्वोच्च न्यायालयाची मंदिर व्यवस्थापनाकडे विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 05:58 IST

शतकानुशतके श्रद्धा, विवेक व प्रेरणा या सूत्रांवर हिंदू धर्म आपली वाटचाल करत आला आहे, त्यामुळे जगन्नाथ मंदिरामध्ये बिगरहिंदुंना प्रवेश देण्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाने विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : शतकानुशतके श्रद्धा, विवेक व प्रेरणा या सूत्रांवर हिंदू धर्म आपली वाटचाल करत आला आहे, त्यामुळे जगन्नाथ मंदिरामध्ये बिगरहिंदुंना प्रवेश देण्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाने विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या पत्नीने अलीकडेच जगन्नाथ मंदिराला दिलेल्या भेटीला काही सेवकांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, इतरांच्या धर्मश्रद्धांवर गदा आणावी, असा विचार हिंदू धर्म कधीच करत नाही. जगन्नाथ मंदिराचे नियम व परंपरांचे पालन करण्यास तयार असलेल्या अन्य धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश द्यायला काहीच हरकत नाही. जे अन्य देवांची भक्तिभावाने पूजा करतात, ते एकप्रकारे माझीच आराधना करत असतात, असे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाने सांगितले होते. ते वचनही न्यायालयाने शुक्रवारी उद््धृत केले. मीनाक्षी प-ही यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेच्या सर्व बाजू अ‍ॅमिकस क्युरी गोपाल सुब्रमणियम तपासून पाहणार आहेत.इंदिरा गांधी यांना दिला नव्हता प्रवेशइंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना या मंदिरात प्रवेश नाकारला होता. त्या हिंदू असल्या, तरी बिगरहिंदूशी विवाह केला होता, हे त्यामागचे कारण होते. बौद्ध, जैन, शिखांना या मंदिरात प्रवेश देण्यात येतो. नेपाळचे हिंदू राजे व भूतानचे महाराज मंदिराला पूर्वीपासून भेट देत आले आहेत.सरकारी जागेत धार्मिक विधी करता येतात का?भारतासारख्या सेक्युलर देशात सरकारी मालकीची जमीन किंवा मालमत्तेमध्ये धार्मिक विधी किंवा कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी की नाही, अशी विचारणा करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आर. एफ. नरिमन, न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने विस्तारित खंडपीठाकडे वर्ग केली. दिल्लीतील एका मैदानात ‘जागरण’ व ‘माता की चौकी’ हे कार्यक्रम करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ज्योती जागरण मंचाने ही याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :templeमंदिरCourtन्यायालय