शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पार्टीसाठी लोकांनी दिलेला फंड परत करणार - कमल हासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 7:39 PM

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती. तसेच, आपण नवीन पार्टीची स्थापना करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, अद्याप कमल हासन यांनी पार्टीसाठी अधिकृत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. मात्र, पार्टीसाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि लोकांनी फंड देण्यास सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्देपार्टीची स्थापना आणि नामकरण करण्याआधीच फंड जमासुरुवातीला पार्टी मजबूत केली पाहिजेराजकारणात येण्यापासून माघार घेत नाही,

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती. तसेच, आपण नवीन पार्टीची स्थापना करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, अद्याप कमल हासन यांनी पार्टीसाठी अधिकृत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. मात्र, पार्टीसाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि लोकांनी फंड देण्यास सुरुवात केली आहे. तमीळ मॅगझिनमध्ये आलेल्या कॉलममध्ये कमल हासन यांनी याबाबत लिहिले आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी आणि चाहत्यांनी पार्टीसाठी पैसे दिले आहेत. त्यांचे पैसे परत करणार आहे. पार्टीची स्थापना आणि नामकरण करण्याआधीच फंड जमा केला. तर तो बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे आधी पार्टी काढण्यात येईल. नामकरण करण्यात येईल. त्यानंतरच फंड जमा करण्यात येईल, असे कमल हासन यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, पार्टीसाठी आलेला फंड परत करताेय याचा अर्थ असा नाही की मी राजकारणात येण्यापासून माघार घेत आहे. आपल्याला सुरुवातीला पार्टी मजबूत करायची आहे. तसेच, भवितव्याचा विचार केला पाहिजे. आगामी पिढीकडे पाहिले नसल्यामुळे अनेक राजकीय पार्ट्या अयशस्वी ठरल्या आहेत, असेही कमल हासन यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या नवीन पार्टीसाठी चाहत्यांकडून आणि लोकांकडून आत्तापर्यंत 30 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाच्या स्थापनेआधी राज्याचा दौरा करणारराजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी अभिनेते कमल हासन हे तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई, असे कमल हासन यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते.

ममता बॅनर्जींसह दोन मुख्यमंत्र्यांना भेटलेकमल हासन हे 23व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोलकात्याला गेले होते; हीच संधी साधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. कमल हासन यांनी भेट घेतलेल्या त्या तिस-या बिगर-भाजपा आणि बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. याआधी 1 सप्टेंबर रोजी त्यांनी थिरुवनंतपुरमला जाऊन केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भोजनाचे निमंत्रण देऊन चेन्नईला बोलावून घेतले होते. नंतर दोघे एकत्रितरीत्या पत्रकारांनाही सामोरे गेले होते. भेटीचा उद्देश आणि अजेंडा याबाबत दोघांनीही मौन बाळगले होते. .

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन