सुशासनातून लोकांना चांगली सेवा मिळणार

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30

फोटो आहे....

People will get good service through good governance | सुशासनातून लोकांना चांगली सेवा मिळणार

सुशासनातून लोकांना चांगली सेवा मिळणार

टो आहे....
गडकरी यांचे प्रतिपादन : मेयो हॉस्पिटल येथे स्वच्छता अभियान
नागपूर : भारत सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. यातून लोक ांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केला. मेयो हॉस्पिटल येथे आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साध्य करणे व सुशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना चांगली सेवा देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत, प्रदूषणमुक्त भारताचा संकल्प केला आहे. यातूनच देशभरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. महापालिकेनेही शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे.
भारत सरकारने अटलबिहारी वाजपेयी व स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न हा सवार्ेच्च पुरस्कार जाहीर केला आहे. हा निर्णय युवकांसाठी पे्ररणादायी असल्याचे सांगून वाजपेयी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मेयो हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी आमदारांसोबत चर्चा करून नवीन आराखडा तयार केला जाणार आहे. स्वच्छता अभियानाची सुरुवात करून हास्पिटलने चांगला संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, महापौर प्रवीण दटके, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)
बॉक्स...
स्वच्छता अभियानाचा शुभारंभ
मेयो परिसरात नितीन गडकरी यांच्यासह अजय संचेती, प्रवीण दटके, बनवारीलाल पुरोहित ,डॉ. प्रकाश वाकोडे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने,अर्चना डेहनकर आदींनी प्रतिकात्मक झाडू मारून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
बॉक्स...
रुग्णांना फळवाटप
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाजप व्यापारी आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. विजयसिंग ठाकूर यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्र म आयोजित केला जातो. यावेळी अजय संचेती, गिरीश व्यास,संघटनेचे अध्यक्ष मनोहरलाल आहुजा, महेंद्रसिंग कटारिया, रामअवतार अग्रवाल, विजय घाटे, अनिल जैन, मनोज सोनी, परेश ढोबळे, किशोर राठोड, मोहनलाल गुप्ता, मनोज शर्मा, प्रकाश पाटणी, विजय अग्रवाल यांच्यासह शहरातील आमदार उपस्थित होते.

Web Title: People will get good service through good governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.