शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 08:25 IST

'जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे.'

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबतकाँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्त्यांवरुन भाजपाने जोरदार टीका केली आहे. यातच, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बुधवारी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे. जेव्हा संसदेमध्ये त्यांच्या पक्षाचा नेता काश्मीरच्या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रांशी जोडून बोलत होता, तेव्हाच राहुल गांधींनी बोलायला हवे होते. त्याचवेळी त्यांनी त्या नेत्याला थांबवून सांगायला पाहिजे होते की, आमची काश्मीरबाबत ही भूमिका आहे. काँग्रेसने आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. याचबरोबर, ज्यावेळी देशात निवडणुका येतील. त्यावेळी या नेत्यांच्या विरोधकांना काहीही बोलण्याची गरज नाही. जर ते म्हणतील हे (विरोधी नेते)  कलम 370 चे समर्थक आहेत, तर लोक त्यांना बुटाने मारतील, असेही ते म्हणाले. 

आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे  या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय, आगामी सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही सत्यपाल मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान, कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक विधाने केली होती. याच विधानाचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाArticle 370कलम 370