जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : राम शिंदे
By Admin | Updated: July 19, 2015 21:34 IST2015-07-19T21:34:49+5:302015-07-19T21:34:49+5:30
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आनंदाने कुंभपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. शहरातील साउंड सिस्टिमच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : राम शिंदे
त र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आनंदाने कुंभपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. शहरातील साउंड सिस्टिमच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. येथील कुशावर्तावर शाहीस्नानासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला खबरदारी घेण्यासाठी सूचना केल्या असून, येथे येणार्या भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. कुशावर्ताची पाहणी करून त्यांनी पोलिसांनी केलेल्या नियोजनाविषयी माहिती घेतली. याच ठिकाणी लोटालोटी, चेंगराचेंगरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका याच ठिकाणी मोलाची असून, संपूर्ण कुंभमेळ्यात पोलिसांचा रोल महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते म्हणाले. कुशावर्तावर भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचे स्वागत केले व पालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने आणि त्यातही सिंहस्थ पर्वकाल सुरू असल्याने कुशावर्तावर सिंहस्थ स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, शिंदे यांनी गोदावरीवरील घाटांची पाहणी केली. कुशावर्तावर गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, म्हणून तीन घाट उभारण्यात आले असून, यातील दोन घाटांची शिंदे यांनी पाहणी केली. तत्पूर्वी त्र्यंबक येथे बांधलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. माने, डॉ. लोंढे यांनी तेथील व्यवस्थेची, इमर्जन्सी वॉर्ड, लिफ्टची माहिती दिली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले आदि मान्यवर उपस्थित होते. त्र्यंबकचा चेहरामोहरा पाहून घाट व्यवस्थेचे अवलोकन करून साधुग्राम पोलिसांसाठी तयार करण्यात आलेले रक्षकनगर, वाहनतळ आदिंची सखोल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.चौकटदंगलीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांची हरसूलला भेटहरसूल येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी प्रथम हरसूलला भेट दिली. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी तेथील नागरिकांना शांततेचे आवाहन केले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आदि अधिकारी उपस्थित होते.