शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 22:22 IST

Bihar News : हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच 'Bihar is not for beginner' म्हणाल.

Bihar News : Bihar is not for beginner...बिहारमध्ये कधी कोणती विचित्र घटना घडेल, काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना...मुख्यमंत्री नितीश कुमार शुक्रवारी सहरसा जिल्ह्यातील अमरपूर येथे सरकारी योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यासाठी गेले होते. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागातर्फे बायोफ्लॉक(तात्पुरता माशांचा पूल) लावण्यात आला होता, ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे टाकण्यात आले होते. पण, कार्यक्रम आटोपल्यानंतर मासे लुटण्यासाठी अनेकजण बायोफ्लॉकवर तुटून पडले. या गर्दीसमोर सरकारी अधिकारीदेखील हतबल झाले होते.

मुख्यमंत्री नितीश कुमार आज सहरसामधील अमरपूर येथे सरकारी योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी आले होते. प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर सीएम नितीश कुमार हेलिकॉप्टरमधून पाटण्याला रवाना होताच, तिथे उपस्थित लोकांनी बायोफ्लॉकमधून मासे लुटण्यास सुरुवात केली. लोकांनी काही मिनिटांतच बायोफ्लॉमधील सर्व पाणी सांडून दिले आणि मासेही फस्त केले. 

नितीश कुमारांना पाहायला नाही, मासे न्यायला आलोमासे घेऊन जाणाऱ्या तरुणांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाहायला नाही, तर मासे घेण्यासाठी आले आहेत. मासे घेऊन जाणाऱ्या एका तरुणाने म्हटले की, मी नितीश कुमार यांना भेटलो नाही, पण आज फिश पार्टी नक्कीच करणार आहे. सुरुवातीपासून आमची नजर माशांवर होती. आज नितीश कुमार यांच्या नावाने आम्ही फिश पार्टी करू, असेही तो तरुण म्हणाला.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल