शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:01 IST

Rahul Gandhi Mumbra Train Accident: मुंब्रामध्ये रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

Rahul gandhi on Mumbra Train Accident: दोन लोकल रेल्वे क्रॉस होत असताना धक्का लागून भयंकर घटना मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले. मोदी सरकार सेवेचा आनंदोत्सव करत असताना देशातील सत्य परिस्थिती मुंबईतून येत आहे. लोक रेल्वेतून पडून मेले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंब्रा रेल्वे स्थानकावरील घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. 

राहुल गांधी म्हणाले, "मोदी सरकार ११ वर्षातील सेवेचा उत्सव साजरा करत असताना देशातील परिस्थिती मुंबईतून येत असलेल्या दुःखद घटनेमध्ये दिसत आहे. रेल्वेमधून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे."

मोदी सरकारची ११ वर्षे फक्त प्रचार

"भारतीय रेल्वे कोट्यवधी जिवांचा कणा आहे. पण, आज असुरक्षा, गर्दी आणि विस्कळीतपणाचे प्रतीक बनली आहे. मोदी सरकारचे ११ वर्षे ना उत्तरदायित्व आणि ना बदल, फक्त प्रचार अशी आहेत", अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

वाचा >>"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

"सरकारने २०२५ बद्दल बोलणं सोडून दिलं आहे, आता २०४७ ची स्वप्न विकत आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो", असे राहुल गांधी म्हणाले. 

रेल्वेतून पडून यांचा झाला मृत्यू 

१) राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा)

२) केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर) 

३) मयूर शाह (वय ५० )

४) विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी)

जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे

१) शिवा गवळी (वय २३ वर्ष. यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

२) आदेश भोईर (वय 26 वर्ष, रा. आटगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

३) रिहान शेख (वय २६ वर्ष, रा. भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

४) अनिल मोरे (वय४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

५) तुषार भगत (वय २२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व  त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

६) मनीष सरोज (वय २६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

७) मच्छिंद्र गोतारणे (वय ३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

९) स्नेहा धोंडे (वय २१ वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

९) प्रियंका भाटिया (वय २६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmumbraमुंब्राAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेMumbai Localमुंबई लोकल