शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 6:30 AM

Narendra Modi : संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी  आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला. 

नवी दिल्ली  - संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी  आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत गदारोळ माजविणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही हे सत्य तशी वर्तणूक असणाऱ्यांनी मतदारसंघात कानोसा घेतला तर त्यांना कळून येईल. मात्र, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट विचारांनी कामकाजात मोलाची भर घातली आहे, अशा लोकांना समाज नीट लक्षात ठेवतो. अशा खासदारांनी केलेली भाषणे, वक्तव्ये यांना ऐतिहासिक मोल प्राप्त होते. 

...तर करणार कारवाईलोकसभा व राज्यसभेत गदारोळ माजविणाऱ्या १४६ खासदारांना गेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले होते. ते सर्वजण आता संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात सहभागी होत आहेत. मात्र, त्यांनी सभागृहात फलक आणू नये व कामकाजात अडथळे निर्माण करू नये. मात्र तसे न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोदींनी दिला.

‘भाजपने लोकशाही धोक्यात आणली’भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे तसेच संसदेचा अपमान केला आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. १५व्या लोकसभेच्या कामकाजात भाजपनेच सर्वाधिक अडथळे आणले होते हे यासंदर्भातील गेल्या वीस वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीचा अभ्यास केला असता स्पष्ट होते, असा दावाही खरगे यांनी केला आहे.

महिला शक्तीचे सामर्थ्य...- गुरुवारी एकप्रकारे महिला शक्तीचा उत्सवच साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सर्वांनीच महिला सामर्थ्याचा अनुभव घेतला. - विविध क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

मोदी म्हणाले...- नेहमी नकारात्मक विचार मांडणाऱ्या व अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही. -ही स्थिती पाहता विद्यमान लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात उत्तम कामगिरी करण्याची संधी खासदारांनी गमावू नये.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Narendra Modiनरेंद्र मोदी