'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:18 AM2018-12-15T05:18:20+5:302018-12-15T05:18:51+5:30

लोकजनशक्ती पार्टीही नाराज

People disappointed with Ram, Hanuman issues | 'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

Next

पाटणा : पाच राज्यांतील निकालांवर भाष्य करताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, मोदी लाट ओसरल्याचे हे संकेत नाहीत, तर लोकांना एनडीएकडून विकास हवा आहे. राममंदिर आणि हनुमानाचे मुद्दे जेव्हा चर्चेत येतात तेव्हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि ते निराश होतात.

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाशासित राज्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शिवराज सिंह चौहान आणि रमन सिंह हे दीर्घ काळापासून मुख्यमंत्री होते; पण त्यांनी अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीनंतरही चांगला लढा दिला.एलजेपीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की, निकाल मोदींच्या बाजूने आहेत; पण यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदी भाषक राज्यात भाजपाच्या पराभवाबद्दल काय सांगाल, असा सवाल केला असता ते म्हणाले की, याबाबत मी बोलणार नाही; पण विकास हा भाजपाचा आदर्श राहिलेला आहे.

भाजपापासून जाणार दूर?
राममंदिरासाठी मोदी सरकार वटहुकूम आणू शकते काय? याबाबत सवाल केला असता पासवान म्हणाले की, जर असा वटहुकूम आणण्याचे सरकारने ठरविले, तर त्याबाबतची भूमिका आपला पक्ष निश्चितच करील.
तूर्तास, याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे.
एनडीएचे सहकारी उपेंद्र कुशवाह आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आणि पाच राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आता एलजेपी आणि जनता दल युनायटेड भाजपापासून अंतर राखणार काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे.

Web Title: People disappointed with Ram, Hanuman issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.