शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोक विचारत आहेत, जाहीरनाम्याचे काय?, भाजपा आणि काँग्रेसलाही होतोय उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:35 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला नाही.

महेश खरे सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला नाही. ही निवडणूक जाहीरनाम्याशिवायच लढविली जाणार आहे काय? असा सवाल मतदार विचारत आहेत.काँग्रेसने सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून नव्हे, तर गुजरातच्या जनतेला विचारून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञान, संशोधनातील दिग्गज सॅम पित्रोदा आणि मधुसूदन मिस्त्री यांच्या टीमकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी गुजरातचा दौरा करुन मतदारांशी संवाद करुन परिवर्तनाबाबत मते जाणून घेण्याची योजना होती.पित्रोदा यांनी केला होता दौरासॅम पित्रोदा आणि मिस्त्री यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या निर्देशानुसार दौराही केला होता. अहमदाबाद,बडोदा आणि सूरतमध्येही ते आले होते. विविध वर्गांतील लोकांशी त्यांनी चर्चा केली. लोकांची ‘मन की बात’ऐकली आणि आश्वासन दिले की, लोकांच्या सूचनांना महत्त्व दिले जाईल. दरम्यान, काँगे्रसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची तारीख २८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, डिसेंबर महिना सुरू झाला, तरी याबाबत हालचाल दिसत नाही.भाजपाचा मुद्दा विकासगुजरातचा विकास हाचभाजपाचा निवडणुकीचा मुद्दा आहे. त्यांच्या जाहीरातीत ‘मैंहूं विकास, सर्वांगीण विकास’ याबाबत बोलले जात आहे. भाजपाच्या जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप दिले जातअसून, तो कधीही जनतेसमोर येऊ शकतो. आमच्या २२ वर्षांच्या कामातून हे दिसून येते की, आम्ही गुजरातचा गौरव, समृद्धी आणि शांती यासाठी काम करत आहोत, असेही त्यांचे म्हणणे आहे.जाहीरनामा नव्हे,तर वचन पत्रतर, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आम्ही जाहीरनामा नव्हे, तर वचन पत्र बनविणार आहोत. यात गुजरातची रुपरेखा असणार आहे. छोटे व्यावसायिक, कुटीरोद्योगयांना साधनसामुग्री, आवश्यकमदत उपलब्ध करुन देणार आहोत. त्यांचा इशारा कापड उद्योगाकडे होता. यातील लोक जीएसटीमुळे नाराज आहेत.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस