न्यायालयीन कक्षात मोबाईलवर बोलणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:02+5:302015-02-13T23:11:02+5:30
केंद्रपाडा(ओडिशा):न्यायालयात सुनावणी सुरू असताना मोबाईलवर बोलणे, येथील एका ३२ वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले़ न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईला त्याला सामोरे जावे लागले़

न्यायालयीन कक्षात मोबाईलवर बोलणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई
क ंद्रपाडा(ओडिशा):न्यायालयात सुनावणी सुरू असताना मोबाईलवर बोलणे, येथील एका ३२ वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले़ न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईला त्याला सामोरे जावे लागले़रंजीत प्रधान, असे या व्यक्तीचे नाव आहे़ गोपालपूर गावातील रहिवासी असलेला रंजीत काल गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमक्ष सुनावणी सुरूअसताना मोबाईलवर बोलत असताना आढळून आला़ न्यायदंडाधिकारी रबी नारायण पांडा यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ न्यायालयाच्या आदेशानुसार रंजीतला २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़ दंडाची ही रक्कम भरल्यानंतरच त्याला सोडण्यात आले़