Pegasus Spying: 40 हून अधिक पत्रकार, 2 मंत्री, 1 जज अन् 3 विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेरगिरीचा दावा; पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:58 PM2021-07-19T12:58:24+5:302021-07-19T13:05:53+5:30

द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात आरोप करण्यात आला आहे, की जगातील अनेक सरकारे पेगासस नावाच्या एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमाने मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि मोठ्या वकिलांसह अनेक मोठ्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे.

Pegasus spying Claim of spying on more than 40 journalists one judge two ministers and three opposition leaders see the names list | Pegasus Spying: 40 हून अधिक पत्रकार, 2 मंत्री, 1 जज अन् 3 विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेरगिरीचा दावा; पाहा यादी

Pegasus Spying: 40 हून अधिक पत्रकार, 2 मंत्री, 1 जज अन् 3 विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेरगिरीचा दावा; पाहा यादी

Next

नवी दिल्ली - भारतात हेरगिरीचा दावा करण्यात येत आहे. यानुसार देशात 40 हून अधिक पत्रकार, तीन प्रमुख विरोधी पक्षातील नेते, एक घटनात्मक अधिकारी, नरेंद्र मोदी सरकारमधील दोन मंत्री, संरक्षण संघटनांमधील वर्तमान आणि माजी प्रमुख तथा अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली आहे.

द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात आरोप करण्यात आला आहे, की जगातील अनेक सरकारे पेगासस नावाच्या एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमाने मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि मोठ्या वकिलांसह अनेक मोठ्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे. यात भारताचाही समावेश आहे. मात्र, भारत सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.

ज्या मुद्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत तो Pegasus फोन हॅकिंग वाद आहे तरी काय ?

या लोकांची नावं आली समोर -

  • रोहिणी सिंह- पत्रकार, द वायर
  • स्वतंत्र पत्रकार स्वाती चतुर्वेदी 
  • सुशांत सिंह,  इंडियन एक्सप्रेस
  • एसएनएम अब्दी, आउटलूकचे माजी पत्रकार
  • परंजॉय गुहा ठाकुरता,  ईपीडब्ल्यूचे माजी संपादक
  • एमके वेणू, द वायरचे संस्थापक
  • सिद्धार्थ वरदराजन, द वायरचे संस्थापक
  • एका भारतीय वृत्तपत्राचे वरिष्ठ संपादक 
  • झारखंडमधील रामगडचे स्वतंत्र पत्रकार रूपेश कुमार सिंह 
  • सिद्धांत सिब्बल, वियॉनचे परराष्ट्र मंत्रालयाचे पत्रकार
  • संतोष भारतीय, वरिष्ठ पत्रकार, माजी खासदार
  • इफ्तिखार गिलानी, माजी डीएनए रिपोर्टर 
  • मनोरंजना गुप्ता, फ्रंटियर टीव्हीच्या मुख्य संपादक
  • संजय श्याम, बिहारचे पत्रकार
  • जसपाल सिंह हेरन, दैनिक रोजाना पहरेदारचे मुख्य संपादक 
  • सैयद अब्दुल रहमान गिलानी, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक 
  • संदीप उन्नीथन, इंडिया टुडे
  • विजेता सिंह, द हिंदूच्या गृहमंत्रालयाशी संबंधित पत्रकार
  • मनोज गुप्ता, टीव्ही-18 चे इंव्हेस्टिगेटिव्ह एडिटर 
  • हिंदुस्तान टाइम्स समूहाचे चार आजी आणि एक माजी कर्मचारी (कार्यकारी संपादक शिशिर गुप्ता, संपादकीय पेजचे संपादक आणि माजी ब्यूरो चीफ प्रशांत झा, रक्षा संवाददाता राहुल सिंह, काँग्रेस कव्हर करणारे माजी राजकीय रिपोर्टर औरंगजेब नक्शबंदी)
  • हिंदुस्तान टाइम्स समूहाचे वृत्तपत्र टीमचे एक रिपोर्टर
  • संरक्षण संबंधांवर लिहिणारे वरिष्ठ पत्रकार प्रेमशंकर झा 
  • माजी राष्ट्रीय संरक्षण रिपोर्टर सैकत दत्ता
  • स्मिता शर्मा, टीवी-18 च्या माजी अँकर आणि द ट्रिब्यूनच्या डिप्लोमॅटिक रिपोर्टर

 
याशिवाय, या वृत्तात इतर नावांचा काही ना काही कारणाने खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, येणाऱ्या काळात आणखीही काही नावांचा खुलासा होईल, असेही सांगण्यात आले ओहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे, की अनेक पत्रकारांशी फॉरेन्सिक विश्लेषणात सहभागी होण्यासंदर्भात बोलण्यात आले. मात्र, त्यांनी काही कारणे सांगत यात भाग घेतला नाही.

असा आहे गार्डियनचा आरोप -
गार्डियन वृत्तपत्रानुसार, हेरगिरी करण्यासाठी वापरले जाणारे हे सॉफ्टवेअर इस्रायली सर्व्हिलान्स कंपनी NSO ने देशांच्या सरकारांना विकले आहे. गार्डियन वृत्तपत्राने केलेल्या खुलाशानुसार या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने 50 हजारहून अधिक लोकांची हेरगिरी करण्यात येत आहे.
 

Web Title: Pegasus spying Claim of spying on more than 40 journalists one judge two ministers and three opposition leaders see the names list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.