शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 16:08 IST

दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देपीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेचा जबाब हा विश्वासार्ह नसल्याचा दावा करत न्यायालयानं फारुखी यांना या आरोपातून मुक्त केलं आहे. पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

नवी दिल्ली, दि. 25 - दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेचा जबाब हा विश्वासार्ह नसल्याचा दावा करत न्यायालयानं फारुखी यांना या आरोपातून मुक्त केलं आहे. पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयाला स्थगिती देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फारुखी यांनी कथितरीत्या मार्च 2015मध्ये दक्षिण दिल्लीतील स्वतःच्या घरात 30 वर्षीय अमेरिकन संशोधक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दिल्ली उच्च न्यायालयानं 85 पानांच्या निर्णयातून तुरुंगात असलेल्या फारुखी यांना तात्काळ मुक्त करा, असा आदेश पोलिसांना दिला आहे. पीडित महिलेचा जबाब हा विश्वासार्ह नाही, तसेच फारुखी यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची शंकाही न्यायालयानं व्यक्त केली आहे. न्यायालयानं यावेळी पीडित महिलेच्या वकिलांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. खरंच अशी घटना झाली होती का ?, जर असा प्रकार झाला तर तो पीडितेच्या सहमतीनं झाला होता का ?, न्यायालयाच्या या प्रश्नांवर पीडिता संभ्रमात पडली, त्यामुळेच न्यायालयानं फारुखी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तत्पूर्वी फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात सुनावणीवेळी फारुखी यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.त्या दिवशी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. तसेच फारुखी आणि अमेरिकन संशोधक महिला यांच्या 2015मध्ये संबंध असल्याचा युक्तिवादही फारुखी यांच्या वकिलानं केला आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी फारुखी यांच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढत बलात्कार झाल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे. त्यामुळेच कनिष्ठ न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावल्याचीही माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. कनिष्ठ न्यायालयानं 4 ऑगस्ट 2016ला फारुखी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी पीडिता त्यांच्या घरी एकटी असताना फारुखी यांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच न्यायालयानं फारुखी यांच्याकडून 50 हजार रुपयांचा दंडही वसूल केला होता. महिलेच्या तक्रारीवरून फारुखी यांना 19 जून 2015 रोजी अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. 

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार