दुचाकीस्वाराने पादचार्यास उडविले
By Admin | Updated: February 19, 2016 22:26 IST2016-02-19T22:26:16+5:302016-02-19T22:26:16+5:30
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रशांत सोपान आंधळे (वय २१ रा.लिंबोळी ता.आष्टी जि.बीड) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता शिरसोली गावाजवळ झाला. याबाबत दुचाकीस्वार रवींद्र हिरामण भील (रा.मन्यारखेडा ता.जळगाव) याच्याविरुध्द शुक्रवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराने पादचार्यास उडविले
ज गाव: भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रशांत सोपान आंधळे (वय २१ रा.लिंबोळी ता.आष्टी जि.बीड) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता शिरसोली गावाजवळ झाला. याबाबत दुचाकीस्वार रवींद्र हिरामण भील (रा.मन्यारखेडा ता.जळगाव) याच्याविरुध्द शुक्रवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत व त्याचा मित्र ज्ञानेश्वर बाबासाहेब दहिफळे (वय २२ रा.बार्वी ता.शिरुर जि.बीड) हे दोघं जण शिरसोली गावापासून अर्धा कि.मी अंतरावर असलेल्या ओम नगराजवळ पाय चालत असताना मागून दुचाकीवर (क्र.एम.एच.१९ ए.बी.२९९५) आलेल्या रवींद्रने प्रशांतला जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या अपघातात दुचाकीस्वारालाही किरकोळ खरचटले आहे.अल्पवयीन मुलीस पळविलेजळगाव : तांबापुरा भागातील बिलाल चौक व महादेव मंदिर परिसरातून गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आले आहे. मेहरुन भिलाटी भागात राहणार्या मुलीच्या आईने याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.