पीकविमा वाटप सुरु

By Admin | Updated: July 13, 2015 16:06 IST2015-07-13T16:06:56+5:302015-07-13T16:06:56+5:30

वांजरवाडा : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत २ कोटी २९ लाख ७० हजार रुपये पीकविमा जमा झाला आहे. या शाखेत १४ गावांचा समावेश असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशे˜े यांच्या हस्ते विमा वाटपास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे़

Peasima allocation started | पीकविमा वाटप सुरु

पीकविमा वाटप सुरु

ंजरवाडा : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत २ कोटी २९ लाख ७० हजार रुपये पीकविमा जमा झाला आहे. या शाखेत १४ गावांचा समावेश असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशे˜े यांच्या हस्ते विमा वाटपास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे़
या शाखेत गावनिहाय वाटपाची यादी लावली असून, चेरा या गावापासून वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. वांजरवाडा, चेरा, धामणगाव, हावरगा, डोमगाव या गावास तारखेनुसार पीकविम्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक एम.एच. कव्हाणकर यांनी दिली़ यावेळी बालाजी केंद्रे, उस्मान मोमीन, सोमेश्वर सोप्पा, संग्राम टाले, व्यंकट लांडगे, बालाजी पवार, बालाजी सिंदगीकर, माधव बंडे, बाळू नळंदवार, फिल्ड ऑफिसर सांगवे, केंद्रे, अंबेसंगे, पी.जी. चाकूरकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Peasima allocation started