पुणे जिल्‘ातील ६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुके : नव्याने पीक कर्जही मिळणार

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकर्‍यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे.

Peak loan vacancy in 66 villages of Pune district: Shirur, Purandar, Junnar and Ambegaon talukas will get new crop loan. | पुणे जिल्‘ातील ६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुके : नव्याने पीक कर्जही मिळणार

पुणे जिल्‘ातील ६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुके : नव्याने पीक कर्जही मिळणार

णे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकर्‍यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे.
ही ६६ गावे शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील आहेत. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीक कर्जाचा कालावधी एकाच वर्षांचा असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने दुष्काळ आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली होती. पीक कर्ज घेऊन खरीपाची केलेली पेरणी पावसाअभावी जळून गेली आणि शेतकर्‍यांच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे पीक कर्जाची परतफेडक कशी करायची, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर होता. त्यामुळे या वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती.
त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय गेल्या आठवडयात घेतला होता.
पुणे जिल्‘ातील शिरूर, पुरंदर, जुन्नर व आंबेगाव या तालुक्यातील ६६ गावांमधील गतवर्षीच्या खरीप हंगामातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली होती. त्यामुळे या ६६ गावांमध्ये पीक कर्ज वसुलीला शासनाच्या या आदेशानुसार स्थगिती मिळाली आहे.
या शेतकर्‍यांकडील पीक कजार्चे पुनर्गठण किंवा रूपांतर बॅंकांनी किंवा संस्थांनी करावे, अशा सूचना सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. थकीत पीक कर्जाचे पुनर्गठण व्याजासह करण्यात येणार असून त्याचा कालावधी ५ वर्षांचा ठेवण्यात येणार आहे. यंदाच्या खरीप पीक कर्जाच्या पुनर्गठणाची कार्यवाही बॅंकांनी ३० एप्रिल २०१६ पयंर्त तसेच रब्बी पीक कर्जाच्या पुनर्गठणाची कार्यवाही ३० जुलै २०१६ पयंर्त पूर्ण करायची आहे. पुनर्गठणाची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शेतकर्‍यांना बॅंकांनी पुढील खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावयाचे आहे, अशी माहिती ग्रामिण जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली आहे.
पुणे जिल्‘ातील सर्व कर्जदार शेतकर्‍यांनी त्यांच्या कजार्चे पुनर्गठण करून नव्याने कर्ज उपलब्ध करून घेण्याकरिता संमतीपत्रासह संबंधीत बॅंकेशी अथवा संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कटके यांनी केले आहे.

Web Title: Peak loan vacancy in 66 villages of Pune district: Shirur, Purandar, Junnar and Ambegaon talukas will get new crop loan.