वाटाणा आवक ४० टक्के घटली ; बाजारभाव सर्वसाधारण
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:21+5:302014-12-20T22:28:21+5:30
पंचवटी : दरवर्षीपेक्षा यंदा वाटाण्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव सर्वसाधारण आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ ६० टक्के वाटाणा मालाची बाजारसमितीत आवक झाली असुन बाजारभाव वीस ते पंचवीस रूपये प्रति किलोवर आले आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होत असतो त्यामुळे बाजारभाव दहा रूपये प्रति किलोवर येतात.

वाटाणा आवक ४० टक्के घटली ; बाजारभाव सर्वसाधारण
प चवटी : दरवर्षीपेक्षा यंदा वाटाण्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव सर्वसाधारण आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ ६० टक्के वाटाणा मालाची बाजारसमितीत आवक झाली असुन बाजारभाव वीस ते पंचवीस रूपये प्रति किलोवर आले आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होत असतो त्यामुळे बाजारभाव दहा रूपये प्रति किलोवर येतात. मात्र यावर्षी वातावरणाचा परिणाम जाणवल्याने वाटाणा मालाची जवळपास ४० टक्के आवक घटली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत मध्यप्रदेश ग्वालहेर या भागातून मोठया प्रमाणात वाटाण्याची आवक होत असते. महिन्याभरापूर्वी हिरवा वाटाणा बाजारात दाखल झाला त्यावेळी साधारणपणे ८० ते ९० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत होता परंतू आवक घटल्याने व त्यातच अन्य भाजीपाला स्वस्त झाल्याने वाटाणा मालाची मागणी कमी झाली आहे म्हणून बाजारभाव सर्वसाधारण असल्याचे बाजारसमितीच्या वतीने सांगण्यात आले. आगामी कालावधीत वाटाणा मालाची आवक वाढली तर बाजारभावात घसरण होऊन वाटाणा प्रति दहा रूपये प्रतिकिलोवर येण्याची शक्यता असल्याचे बाजारसमितीचे भानूदास उगले यांनी सांगितले. (वार्ताहर)