शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पुनरागमनावर मोहोर उठणार,  मनोहर पर्रीकरांना ठाम विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 14:35 IST

पणजी मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीमध्ये 98 टक्के मतदार भाजपाला मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पणजी, दि. 23 - पणजी मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीमध्ये 98 टक्के मतदार भाजपाला मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानानंतर मनोहर पर्रीकर म्हणाले की, ''मला कुणी विरोधक नाहीच. ही निवडणूक माझ्या गोव्यातील पुनरागमनावर मोहोर उठविणार आहे. मला पुरेसे मताधिक्य मिळेल. सार्वत्रिक निवडणुकीत मी गोवाभर प्रचाराचा झंझावात केला. यावेळीही पणजीत पहाटे ५ ते रात्री १0 वाजेपर्यत प्रचार केला.  कोणतीही निवडणूक असो,मी गांभीर्यानेच घेतो. कारण मतदारांना गृहीत धरुन चालत नाही. पणजीसाठी मी अनेक विकासकामे केलेली आहेत आणि त्यामुळेच लोक माझ्या पाठीशी आहेत''. 

पर्रीकर यांचे प्रचारप्रमुख तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, 'लोकांना अधिकाधिक मतदान करण्यासाठी बाहेर पडावं, यासाठी आमचा प्रयत्न आहे'. दरम्यान, टोंक करंझाळे भागात भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. काँग्रेसने या प्रकरणी सिद्धार्थ यांच्याविरुध्द पोलीस तक्रार केली आहे.

मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्यानं विजय होतील - श्रीपाद नाईक दरम्यान,  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. सांपेद्र येथील रायबंदर सरकारी प्राथमिक शाळेतील केंद्रावर दुपारी मतदान केल्यानंतर नाईक म्हणाले की, ''गेल्या निवडणुकांपेक्षा यावेळी मनोहर पर्रीकर यांना जास्त मताधिक्य मिळेल. पर्रीकर यांनी ज्या पद्धतीनं गोव्याचा विकास केला आहे ते पाहता लोकं त्यांच्याबरोबरच राहतील. वाळपईत विश्वजित राणे हे यशस्वी आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनाही लोकांचा पाठिंबा आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाला बाहेरुन उमेदवार आणावे लागले''. दुसरीकडे गोवा सुरक्षा मंचचे मार्गदर्शक तथा माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी मात्र या निवडणुकीत त्यांचा उमेदवार आनंद शिरोडकर हे पर्रीकर यांचा पराभव करुन निवडून येतील, असा दावा केला आहे.  

टॅग्स :BJPभाजपा