शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:51 IST

'2026 मध्ये पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींच्या दहशतीतून मुक्ती मिळेल.'

Amit Shah in West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी(27 ऑक्टोबर 2024) पश्चिम बंगालमध्ये आयोजित पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी कार्यक्रमात बोलताना बांग्लादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ही घुसखोरी थांबवली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा दावा केला. 

शाह म्हणाले, 2026 साली भाजप प्रचंड बहुमताने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल आणि बंगालला सोनार बांगला बनवले जाईल. बंगालला कम्युनिस्ट आणि ममता यांच्या दहशतीतून मुक्त करावे लागेल, त्यासाठी भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीतशाह पुढे म्हणतात, संदेशखळी, आरजी कारच्या घटनांनी हे सिद्ध होते की बंगालमध्ये आमच्या माता, बहिणी सुरक्षित नाहीत. राज्य पुरस्कृत घुसखोरी, बंगालमधील भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2026 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निवडून देणे. राज्य समर्थित घुसखोरी थांबवायची असेल तर 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे लागेल. बंगालमध्ये रवींद्र संगीताऐवजी बॉम्बस्फोट ऐकू येतात, त्यामुळे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंगालमध्ये भाजपचे सरकार बनवणे. जे राजकारण ममता दीदींनी सुरू केले, ते 2026 मध्ये संपणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

घुसखोरी थांबवायची असेल तर...पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. यासाठी राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे राज्यातील शांतता आणि विकासाला खीळ बसली आहे. मी बंगालच्या जनतेला 2026 मध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची आणि भाजपला सत्तेत आणून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचा पाया घालण्याची विनंती करतो, असेही शाह यावेळी म्हणाले.

एक कोटी भाजप सदस्य बनवण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष जातीच्या आधारावर चालतात, मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान होऊ शकतो. लोक जेव्हा भाजपचे सदस्य होतात, तेव्हा ते या देशाला महान बनवण्याच्या आणि देशाचे रक्षण करण्याच्या संकल्पाने स्वतःला समर्पित करतात. करोडो लोकांच्या कल्याणाशी ते स्वतःला जोडून घेतात. भारत मातेला जागतिक नेता बनवण्याची शपथ घ्या. मी बंगालच्या लोकांना आणि तरुणांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी