पीडीपीची भूिमका महत्त्वाची दोन्ही बाजूंची गोळाबेरीज ५५ गुंता कायम : कािश्मरात सरकारसाठी हालचालींना वेग

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30

हरीश गुप्ता/ नवी िदल्ली : भाजपच्या नेत्यांनी जम्मू-कािश्मरात सरकार स्थापण्यासाठी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेत हालचालींना वेग िदला असला तरी पक्षाध्यक्ष अिमत शहा यांनी पिरिस्थती अिस्थर असल्याची कबुली िदली आहे.

PDP's roles continue to hold around 55 rounds of important two sides: Movement of movement for government in Kashmir | पीडीपीची भूिमका महत्त्वाची दोन्ही बाजूंची गोळाबेरीज ५५ गुंता कायम : कािश्मरात सरकारसाठी हालचालींना वेग

पीडीपीची भूिमका महत्त्वाची दोन्ही बाजूंची गोळाबेरीज ५५ गुंता कायम : कािश्मरात सरकारसाठी हालचालींना वेग

ीश गुप्ता/ नवी िदल्ली : भाजपच्या नेत्यांनी जम्मू-कािश्मरात सरकार स्थापण्यासाठी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेत हालचालींना वेग िदला असला तरी पक्षाध्यक्ष अिमत शहा यांनी पिरिस्थती अिस्थर असल्याची कबुली िदली आहे.
नववषार्िनिमत्त अथर्मंत्री अरुण जेटली यांनी िनवडक पत्रकारांना िदल्लीत िदलेल्या मेजवानीच्यावेळी शहा यांनी या राज्यात लवकरच लोकिप्रय सरकार स्थापन होण्याची आशाही व्यक्त केली. ८७ सदस्यीय िवधानसभेत पीडीपीचे २८ आमदार असून या पक्षाला भाजप (२५) आिण काँग्रेस(१२) या दोन्ही पक्षांचे समथर्न घ्यावे लागेल. तसे केल्यास राज्यातील जम्मू, लडाख आिण काश्मीर खोरे या तीनही भागांना प्रितिनिधत्व िमळेल असा युिक्तवादही या पक्षाने केला आहे. त्यातून नॅशनल कॉन्फरन्सला सत्तेबाहेर ठेवण्याचा पीडीपीचा उद्देशही साध्य होऊ शकेल. संपूणर् सहा वषार्ंसाठी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वात िकमान समान कायर्क्रमाच्या आधारावर सरकार चालिवले जावे असे पीडीपीला वाटते. याच कारणामुळे भाजपने सत्तेसाठी दावा न करता केवळ मुदत मािगतली आहे. भाजपने कोणत्या पक्षासोबत चचार् सुरू आहे त्याचे नावही गुलदस्त्यात ठेवले आहे.
------------------
मेहबुबांची गुगली...
पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांची प्रशंसा करतानाच मोदींवर या राज्याबाबत मोठी जबाबदारी असल्याचे सांगत गुगली टाकली आहे. वाजपेयींएवढेच मोदी हेही महनीय व्यिक्तमत्त्व असल्याचे सांगत त्यांनी मोदींनाही तेवढेच महत्त्व देत असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे सवर् २५ आमदार जम्मू भागातील असून मुफ्तींना समथर्न देण्याऐवजी िवरोधात बसण्याची या पक्षाची मन:िस्थती नाही.
-------------
गोळाबेरीज सुरू
सरकार स्थापण्यासाठी १९ जानेवारीपयर्ंत मुदत असल्यामुळे भाजपला कोणतीही घाई नाही. सरकार अिस्तत्वात न आल्यास राज्यपाल राजवटीच्या पयार्यावर िवचार करावा लागेल. पीडीपीने ५५ आमदारांच्या समथर्नाचा दावा केला असला तरी या संख्याबळाबाबत िववरण िदलेले नाही. या पक्षाने भाजपची साथ िमळिवल्यास एकूण संख्याबळ ५५ एवढे होईल. मनोरंजक म्हणजे म्हणजे पीडीपीने काँग्रेस(१२)आिण नॅशनल कॉन्फरन्स(१५) या पक्षांच्या पािठंब्यावर सरकार स्थापन केले तरी संख्याबळ ५५ एवढेच राहील.
----------------
पीडीपी+ भाजप + सज्जाद लोण = ५५
पीडीपी+ काँग्रेस + नॅशनल कॉन्फरन्स = ५५

Web Title: PDP's roles continue to hold around 55 rounds of important two sides: Movement of movement for government in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.