पीडीपीने दिला भाजपला अकरा कलमी प्रस्ताव

By Admin | Updated: February 17, 2015 02:33 IST2015-02-17T02:33:44+5:302015-02-17T02:33:44+5:30

जम्मू-काश्मिरात गत दोन महिन्यांपासून सुरू असलेले राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नाअंतर्गत सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे़

PDP gives BJP eleven-point resolution | पीडीपीने दिला भाजपला अकरा कलमी प्रस्ताव

पीडीपीने दिला भाजपला अकरा कलमी प्रस्ताव

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात गत दोन महिन्यांपासून सुरू असलेले राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नाअंतर्गत सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे़ दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवानंतर काहीशी शिरजोरी दाखवत, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजपला ११ कलमी प्रस्ताव दिला आहे़ दिल्ली निवडणुकीनंतर जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेसंदर्भात भाजपचा सूर काहीसा नरमल्याचे मानले जात आहे़ राज्याच्या ८७ सदस्यीय विधानसभेत सर्वाधिक २८ सदस्य असलेली पीडीपी आणि २५ सदस्य असलेली भाजप यांच्यात कलम ३७०सह अनेक मुद्यांवर मतभेद आहेत़

Web Title: PDP gives BJP eleven-point resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.