पीडीपी-भाजपात कलह
By Admin | Updated: March 9, 2015 06:07 IST2015-03-09T05:31:23+5:302015-03-09T06:07:57+5:30
विघटनवादी नेता मुस्लीम लीगचा अध्यक्ष मसरत आलम याची शनिवारी कारागृहातून सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर युती सरकारमधील दोन पक्ष पीडीपी आणि भाजपामध्ये नव्याने वाद पेटला आहे. त्यावर विविध

पीडीपी-भाजपात कलह
श्रीनगर/जम्मू : विघटनवादी नेता मुस्लीम लीगचा अध्यक्ष मसरत आलम याची शनिवारी कारागृहातून सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर युती सरकारमधील दोन पक्ष पीडीपी आणि भाजपामध्ये नव्याने वाद पेटला आहे. त्यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असतानाच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
हा दोन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाचा (सीएमपी) भाग असून, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व संबंधितांना सामावून घेण्याचा त्यामागे प्रयत्न आहे, असे पीडीपीने रविवारी स्पष्ट केले. आॅक्टोबर २०१०मध्ये आलम याला अटक करण्यात आली होती. साडेचार वर्षे कारागृहात राहिल्यानंतर शनिवारी त्याची सुटका झाली. राज्यातील सर्व संबंधितांसह नियंत्रण रेषेबाहेरील घटकांना सामावून घेणे हा सीएमपीचा भागच आहे, असे पीडीपीच्या मुख्य प्रवक्त्यांनी म्हटले आहे; तर सुटकेचा निर्णय एकतर्फी असून, याबाबत आमच्याशी सल्लामसलत करण्यात आलेली नाही, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.