पीसीबी झिम्बाब्वे

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30

झिम्बाब्वेतील तिरंगी

PCB Zimbabwe | पीसीबी झिम्बाब्वे

पीसीबी झिम्बाब्वे

म्बाब्वेतील तिरंगी
मालिकेत पाकचा सहभाग
कराची : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वेत रंगणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाला हिरवी झेंडी दिली आहे. या मालिकेतील तिसरा संघ वेस्ट इंडिज असेल.
बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीसीबीने संघ खेळणार असल्याचे झिम्बाब्वेला कळविले आहे. ही मालिका ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होईल आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. डबल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या मालिकेशिवाय पाक आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिकादेखील खेळली जाईल.
तिरंगी मालिकेसाठी पाक आणि विंडीजला झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आमंत्रित केल्यानंतर बांगला देश क्रिकेट बोर्डात अस्वस्थता पसरली होती. कारण बांगला देश आयसीसी वन डे रँकिंगमध्ये सातव्या तर वेस्ट इंडिज आठव्या आणि पाक नवव्या स्थानावर आहे. पाक आणि विंडीजला या मालिकेद्वारे स्वत:चे रँकिंग सुधारण्याची संधी असेल. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या आठ स्थानावर राहणारे संघ २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरणार आहेत.(वृत्तसंस्था)
......................................................................

Web Title: PCB Zimbabwe