शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
3
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
4
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
5
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
6
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
7
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
8
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
9
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
10
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
11
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
12
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
13
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
14
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
15
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
16
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
17
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
18
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
19
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
20
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा

ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा; आता पैसे मोजावे लागणार, प्रवाशांच्या खिशावर भार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:13 IST

कोरोनापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. कोरोनाकाळात संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही सुविधा बंद करण्यात आली होती.

नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने चालविला आहे. कोरोनापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. कोरोनाकाळात संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही सुविधा बंद करण्यात आली होती. आपले ब्लँकेट आपणच घेऊन यावे, अशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा विळखा शिथिल झाला आहे. तसेच हिवाळाही सुरू होत आहे. त्यामुळे ब्लँकेटची सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. उलट ही सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याच्या पर्यायावर रेल्वे प्रशासन विचार करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरोनाची  दुसरी लाट आता कमी झाल्यानंतर भारतीय रेल्वेने बहुतेक मार्गांवर लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. देशात सुमारे ९५ टक्के रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत. त्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंगही मिळत आहे. प्रीमियम, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये बेड रोलची सुविधा मात्र अजून सुरू झालेली नाही. हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन सध्या रेल्वे स्थानकांवर डिस्पोजेबल ब्लँकेट, बेडशीट, आदी वस्तूंची दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.डिस्पोजेबल बेडरोल किट आहेत तीन प्रकारचे पहिले किट ३०० रुपयांचे आहे.  यात प्रवाशांना ब्लँकेट, बेडशीट, उशी, उशी कव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, फणी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यूपेपर या वस्तू मिळतात.दुसऱ्या किटची किंमत १५० रुपये आहे. यात केवळ एक ब्लँकेट दिले जाते.तिसरे किट ३० रुपयांचे आहे. त्याला मॉर्निंग किट म्हटले जाते. यात रेल्वे प्रवाशांना टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, फणी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यू पेपर दिला जातो.प्रवाशांच्या खिशाला भारसूत्रांनी सांगितले की, एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिस्पोजेबल ट्रॅव्हल बेडरोलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्ली विभागाने दिल्ली स्थान कावरून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल सुविधा दिली आहे. यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे