पान ४ पैसे, मोबाईल चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:08+5:302015-05-05T01:21:08+5:30

बार्देस : काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिरामध्ये एका व्यक्तीच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल लंपास झाला होता. या प्रकरणी खोर्ली-म्हापसा येथील दोन अल्पवयीनांना म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनी गुन्‘ाची कबुली दिली आहे. घटना सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

Pay 4 money, mobile thieves possess two minor | पान ४ पैसे, मोबाईल चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

पान ४ पैसे, मोबाईल चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

र्देस : काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिरामध्ये एका व्यक्तीच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल लंपास झाला होता. या प्रकरणी खोर्ली-म्हापसा येथील दोन अल्पवयीनांना म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनी गुन्‘ाची कबुली दिली आहे. घटना सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
काणका-म्हापसा येथे मंदिरात कार्यक्रम चालू असताना राजेंद्र आत्माराम धारगळकर (गणेशपुरी-म्हापसा) यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड, ८ हजार रुपयांचा मोबाईल मिळून एकूण २३ हजारांचा ऐवज लंपास झाला होता. म्हापसा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
--------
अपहरण केल्याप्रकरणी तक्रार
बार्देस : तिघांनी कारमध्ये घालून अपहरण केले होते, अशी तक्रार समतानगर-खोर्ली, म्हापसा येथील सनिम मिताप्रा यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात दिली आहे. अपहरणाची घटना रविवारी सायं. ७.३० वा. घडली होती. संतोष नाईक, शे˜ी व जितू अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. म्हापसा पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
---
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा
बार्देस : माडेल-थिवी येथील विद्या वाडकर यांना रविवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास रमेश गडेकर या शेजार्‍याने जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी वाडकर यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार देताच गडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pay 4 money, mobile thieves possess two minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.