शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज, अन् पाणी पुरवणे होय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 13:56 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. याबाबत माहिती देत, शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपाला टोला लगावला. लोकांना शिक्षण, वीज अन् पाणी देणे हीच खरी देशभक्ती असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले.  

दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले. ''जे लोक कामाला पसंती देतात, तेच देशभक्त असतात. सरकारचं काम लोकांच्या जीवनात सुधारणे करणे आहे, लोकांना मदत करणे आहे, नागरिकांच्या कुटुंबांना समृद्ध बनविणे आहे, म्हणजेच देशाला समृद्ध बनवणे होय. म्हणूनच, दिल्लीतील जनतेनं अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान आम्हाला दिलाय, आमच्या कामाचा सन्मान केलाय,'' असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय. 

द्वेषाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी झुगारून प्रेम आणि स्नेहाचं राजकारण स्विकारलंय. देशभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट शिक्षण, आरोग्य आणि उपचार देणे होय. राष्ट्रभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक कुटुंबास स्वस्त दरात आणि 24 तास वीज पुरविणे होय. लोकांना शुद्ध पाणी देणे हे सर्व करणे म्हणजेच देशभक्ती असल्याचंही सिसोदिया यांनी म्हटलंय. सिसोदिया यांनी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाव न घेता टोला लगावला. कारण, भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांना गद्दार आणि देशद्रोही असल्याचं संबोधलं जात होतं. मात्र, दिल्लीच्या जनतेनं पुन्हा एकदा केजरीवाल यांना निवडून देत, भाजपाच्या प्रचाराला नकारलंय.  

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी